राज्य सरकार अडीच वर्ष चालणार, संजय शिरसाट नाराज नाही- मंत्री रावसाहेब दानवे| Sanjay Shirsat| BJP

2022-08-13 1

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हा महत्वाचा कार्यक्रम आयोजित केला असून देशातील भावी पिढीला याबाबत माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.जालन्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार असून टीईटी घोटाळ्यात आरोपींवर जाळं कसं टाकलं यावरच किती मोठे मासे अडकतात हे अवलंबून आहे.अनेकवेळा आरोपी जाळ्यातील छिद्रातून निसटतात.त्यामुळे जाळं कसं टाकलं यावर बरंच काही अवलंबून असल्याचा टोला दानवे यांनी हाणला आहे.संभाजीनगर मधील आमदार संजय शिरसाट हे नाराज नसून हे राज्य सरकार अडीच वर्षे चालणार असून येणाऱ्या विधानसभेत आमचे 200 आमदार निवडून येतील असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला.जालना लोकसभा मतदार संघावर भाजपचा अधिकार असून हा मतदार संघ रावसाहेब दानवेंच्या बापाचा नाही त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्यासाठी हा मतदार संघ सोडला जाणार नाही असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

#RaosahebDanve #SanjayShirsat #EknathShinde #BJP #Maharashtra #ShivSena #PankajaMunde #HWNews

Videos similaires